महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात समोर आलेली असून कामगार तलाठी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा तलाठी कार्यालयातच अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे. 28 तारखेला ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संतोष पवार असे मयत तलाठी कामगार तलाठी यांचे नाव असून तलाठी कार्यालयात घुसून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून टीका करत राज्यात कणा नसलेले सरकार आहे असे म्हटलेले आहे.
दुसरीकडे संपूर्ण राज्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण असून राहुरी येथे गुरुवारी 29 तारखेला महसूल व कामगार तलाठी संघटनेतर्फे काम बंद आंदोलन करून प्रशासनाला या संदर्भात एक निवेदन देण्यात आलेले आहे.
नायब तहसीलदार संध्या दळवी आणि सचिन औटी यांनी हे निवेदन दिलेले असून निवेदनामध्ये संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि कामगार तलाठी यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 50 लाख रुपयांचे विशेष अर्थसहाय्य देण्यात यावे. त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामील करून घ्यावे ,अशी मागणी केलेली आहे.