मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा बांधवांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलेला असून 29 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ सरकारने एक महिन्याच्या कालावधीत आमच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अन्यथा 29 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्र आंतरवाली सराटी येथे माझ्यासोबत बेमुदत उपोषण करेल ‘
मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ विधानसभा निवडणूक लढायची की समोरच्याला पाडायचे याचा निर्णय निवडणूक जाहीर झाल्यावर समाजाला विश्वासात घेऊन घेतला जाईल. मी जातीयवादी नाही मी फक्त आरक्षण मागत आहे. मराठा समाज एकत्र करणे हे आव्हान माझ्यासमोर होते. त्यांनी दिलेले योगदान मी वाया जाऊ देणार नाही ,’ असेही ते पुढे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्ला करत ,’ आमच्यावर हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना हाताशी धरून घडवला होता. जालन्यातील काही भाजप नेते यांना महाजन यांनी हाताशी धरले आणि आमच्यावर हल्ला केला ,’ असेही ते पुढे म्हणाले.