‘ बायकोच्या अंगावर चिठ्ठी फेकली ‘, अखेर ‘ त्या ‘ तरुणाने गमावले प्राण

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निघोजे इथे समोर आलेली असून बायकोच्या अंगावर चिठ्ठी फेकली म्हणून जाब विचारला आणि त्यातून झालेल्या वादातून एका विवाहित तरुणाला त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत समोर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली त्यात अखेर त्याचा मृत्यू झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संकेत रामचंद्र गावडे ( वय 25 वर्ष राहणार सातारा ) असे मयत तरुणाचे नाव असून सदर प्रकरणी दीपक जाधव ( वय पंचवीस वर्षे राहणार दिघी ), दीपक सोनवणे ( वय 26 वर्ष राहणार साई अमृत हॉटेल ),  तेजस सोपान गाढवे ( वय 26 वर्ष चार जण अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

संकेत यांच्या पत्नी चैत्राली यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली असून संकेत यांनी मुख्य आरोपीच्या पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकली असा आरोपींचा संशय होता. त्यातून झालेल्या वादातून सर्व आरोपींनी संकेत यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यानंतर संकेत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे . 


शेअर करा