गूढ उलगडलं..महिला वकिलानेच प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून नेवासा तालुक्यातील पाचेगाव इथे नवऱ्याचा खून करून प्रियकरासोबत पसार झालेल्या वकील पत्नीला तिच्या प्रियकरासोबत बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , मीना अंबादास म्हस्के ( वय छत्तीस वर्ष राहणार रमाबाई नगर जालना ) आणि तिचा प्रियकर शिवाजी डमरे ( वय 31 वर्ष राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा आणि नेवासा पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी केलेली आहे. 

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता. नेवासा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मृतदेहाची ओळख पटत नव्हती. सदर गुन्ह्याचा समांतररित्या नेवासा पोलीस देखील तपास करत असताना एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एक संशयित कार आढळून आली. ही कार अंबादास भानुदास म्हस्के ( राहणार रमाबाई नगर जालना ) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले मात्र त्यांचा फोन बंद येत होता म्हणून त्यांच्या पत्नीला संपर्क केला त्यावेळी ती पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात तिचा प्रियकर लघु शिवाजी डमरे यांच्यासोबत राहत असल्याचे माहिती समोर आली. 

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले त्यावेळी त्यांनी खुनाची कबुली दिलेली असून प्रियकराच्या सोबत प्रेमसंबंध असल्याकारणाने पती अंबादास सातत्याने बायकोचा छळ करत होता म्हणून पुण्याला जायचे आहे असे सांगत पाचगाव शिवारात आणून त्याचा खून करण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले आहे. 


शेअर करा