नगर जिल्ह्यात ‘ ह्या ‘ तारखेपर्यंत पावसाचा अंदाज

शेअर करा

नगर शहरात परवापासून पुन्हा पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केलेली असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाच सप्टेंबर पर्यंत विदर्भ मराठवाड्यात मेघगर्जना सोबत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. 

केरळ किनारपट्टीपासून गुजरात किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला असून त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र इथे हलक्या तसेच मध्यम सरींचा पाऊस होणार आहे. एक तारखेला सकाळपासून ढगाळ वातावरण होते त्यानंतर रात्री दहानंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली होती. शहरातील रस्त्यांची सध्या प्रचंड दुर्दशा झालेली असल्याकारणाने व्यवसायांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे.


शेअर करा