राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती इथे बोलताना ,’ विरोधक इतके वर्ष सत्तेत होते त्यांना महिलांना मदत करण्याचे सुचले नाही. आता आम्ही मदत करत आहोत तर आमच्यावर टीका करण्यात येत आहे. माझ्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना घाबरण्याचे कारण नाही लाडकी बहीण योजना सतत पाच वर्षे सुरू राहील ,’ असे म्हटलेले आहे.
अजित पवार म्हणाले की ,’ आम्ही वचन पाळणारे लोक आहोत आणि वचनपूर्ती करणारे हे सरकार आहे. अडीच कोटी महिलांच्या विकासाचे उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलेले असून आता या योजनेमध्ये जवळपास एक कोटी साठ लाख भगिनी लाभार्थी झालेल्या आहेत आणि आगामी काळात ही संख्या वाढेल.’
लाडका भाऊ योजनेवर देखील अजित पवार यांनी बोलताना ,’ लाडका भाऊ योजना आम्ही कार्यान्वित केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत आहोत. शेतकऱ्यांचे संपूर्ण विज बिल माफ करणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा तुमची साथ हवी आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.