महाराजांचा पुतळा पडला की पाडला ? , कुणी केली चौकशीची मागणी

शेअर करा

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मालवणमधील छत्रपतींचा पुतळा पडल्याप्रकरणी वक्तव्य केलेले असून त्यांनी मी आतापर्यंत मातीचे , प्लास्टिकचे , प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अनेक पुतळ्यांचे उद्घाटन केलेले आहे. प्रति तास 45 किलोमीटर वेगाने वारा असला तर एकही पुतळा पडलेला नाही मात्र मालवण मधील धातूचा पुतळा कसा काय पडला ? महाराजांचा पुतळा पडला की पाडला ? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. सदर प्रकरणी चौकशीची देखील त्यांनी मागणी केलेली आहे

नांदेड येथील एका कार्यक्रमासाठी प्रकाश आंबेडकर आलेले होते त्यावेळी ते म्हणाले की,’ मालवण येथील पुतळा प्रकरणी राजकारण सुरू झालेले असून विरोधकांकडून आंदोलने केली जात आहेत. नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफीही  मागितलेली आहे मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही त्यामुळे पुतळा पाडला की पाडला ? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. महायुती सत्तेत येणे लोकांच्या उपयोगासाठी नाही तर महाराष्ट्राची तिजोरी लुटण्यासाठी आहे असेही ते यावेळी म्हणाले. 


शेअर करा