जुनी पेन्शन योजना बंद पण राष्ट्रीय निवृत्तीवेतन आयोगाची अंमलबजावणी नाही , हजारो कर्मचारी आक्रमक

शेअर करा

राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली मात्र दुसरीकडे नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील 2005 नंतर नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन आयोगाची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे राज्य संवर्गातील जवळपास 3000 अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवा कर्मचारी वगळता तब्बल 350 नगरपरिषद आणि नगरपंचायतीतील 20000 कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. 

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आजपासून या आंदोलनाला सुरुवात करण्यात असून ‘ जुनी पेन्शन योजना बंद केली आणि राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असेल ‘ असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले मात्र तब्बल 19 वर्ष उलटून देखील कोणतीही पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. राज्य सरकार आणि नगर विकास विभाग दखल घेत नसल्याने अखेर या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आंदोलनाची वेळ आलेली आहे. 

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलेले असून वित्त विभाग आणि नगर विकास विभागाने बैठक घेऊन तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 15 नगरपरिषद/नगरपंचायत मधील राज्य संवर्ग अधिकारी, न.प. कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्या मागण्यांकरिता दि.29/08/2024 पासून हे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. 

श्री. महेंद्र कातोरे, विभाग अध्यक्ष, नाशिक विभाग, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद  संवर्ग अधिकारी संघटना, श्री प्रशांत खैरे, जिल्हा अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद  संवर्ग अधिकारी संघटना व  श्री. सचिन सुडके, अध्यक्ष, श्रीगोंदा नगरपरिषद,महाराष्ट्र राज्य नगरपरिषद  संवर्ग अधिकारी संघटना यांच्यासोबत शेकडो कर्मचारी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी बसलेले आहेत. 


शेअर करा