सागर भापकर आणि शैलजा देवकाते यांचे जामीन फेटाळले , काय आहे प्रकरण ? 

शेअर करा

नगर शहरातील सावेडी तलाठी कार्यालयातील तलाठी सागर भापकर आणि मंडळ अधिकारी शैलजा रामभाऊ देवकाते यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली होती त्यानंतर शैलजा देवकाते आणि सागर भापकर यांना निलंबित करण्यात आलेले  आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून दोन्ही जणांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश निरंजन नाईकवाडी यांनी फेटाळला आहे. 

सावेडी येथील तलाठी सागर भापकर आणि मंडळ अधिकारी शैलजा देवकाते यांनी सरकारी काम करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दल तक्रार आली आणि तक्रारदार व्यक्ती यांच्या फ्लॅटच्या नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच स्वीकारल्याचे त्यांनी पंचांसमोर मान्य केले आणि पाचशे रुपयाप्रमाणे 22 फ्लॅटचे अकरा हजार रुपये तलाठ्याला द्या असेही सांगितले होते. 

सदर प्रकरणात शैलजा देवकाते आणि सागर भापकर यांच्या विरोधात तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दोघांच्याही पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे म्हणणे तक्रारदार यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सादर केले आणि त्यानंतर दोन्ही जणांचे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आले आहेत.


शेअर करा