राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे मात्र केंद्रात तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी दिली तरी महाराष्ट्रामध्ये आरपीआयला विचारात घेतले जात नाही शासकीय कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवले जात नाही अशी खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नगर इथे बोलताना व्यक्त केलेली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी बोलताना ते म्हणाले की ,’ राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तुम्हाला मंत्रिपद दिले जाईल असे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात दोन वर्ष उलटली तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही हा आमचा अपमान आहे. अपमान पचवण्याची आम्हाला सवय असून आम्ही तरीदेखील महायुतीसोबत राहणार आहोत.
रामदास आठवले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण इथे पडला त्यावर वक्तव्य करताना ,’ आपण स्वतः त्या ठिकाणी भेट दिली होती. हवेमुळे तो पडला यावर आपला विश्वास नाही. चुकीच्या माणसाला काम दिल्यामुळे त्याचा हा फटका बसलेला आहे ,’ असे म्हटलेले आहे.