स्वतःच्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. आरोपीने त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र उच्च न्यायालयाकडून देखील त्याला दिलासा मिळालेला नाही. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मच्छिंद्र शंकर कदम ( वय 64 राहणार मांजरसुंबा तालुका नगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने त्याची पत्नी आशाबाई उर्फ बायजाबाई मच्छिंद्र कदम हिचा खून केलेला होता. माहेराहून पंधरा हजार रुपये आणावेत यासाठी सातत्याने तिचा तो छळ करत होता. घटना घडली त्या दिवशी त्याने तिला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आणि त्यानंतर विष पाजले त्यात तिचा मृत्यू झाला.
2005 पासून आरोपी फरार झालेला होता मात्र त्याला हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि वांबोरी इथून त्याला ताब्यात घेण्यात आले . स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अटकेची कारवाई करण्यात आली, पोलीस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, शरद बुधवंत, सुरेश माळी यांनी याप्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावली.