लग्न करीन म्हणत होता मात्र ‘ तरीही ‘ आंतरधर्मीय प्रेमातून व्यावसायिकाची अमानुष हत्या : कुठे घडला प्रकार ?

  • by

एकीकडे देशात लव्ह जिहादवरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे दिल्ली येथून अशीच एक आंतरधर्मीय प्रेमातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे .दिल्ली इथे एका नीरज नावाच्या व्यावसायिकाचे एका मुस्लिम धर्मीय तरुणींवर प्रेम होते मात्र तिच्या होणाऱ्या पतीने या व्यावसायिकाची अमानुषपणे हत्या केली. इतकच नाही हत्या केल्यानंतर व्यावसायिकाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन राजधानी एक्सप्रेसमधून गोव्याच्या रस्त्याने भरुचमध्ये फेकून दिला .

उपलब्ध माहितीनुसार, 46 वर्षीय व्यावसायिक नीरज गुप्ता यांचं फैजल (29) नावाच्या तरुणीसोबत तब्बल 10 वर्षांपासून प्रेमसंबंध संबंध होते. विवाहित असलेले नीरज यांना फैजलशी लग्न करायचं होतं. यादरम्यान फैजलचा मोहम्मद जुबैर (28) नावाच्या तरुणाशी साखरपुडा झाला. मात्र नीरज हा फैजलला हा साखरपूडा करण्यापासून थांबवित होता मात्र फैजल व नीरज यांच्यात यामुळे वाद निर्माण झाले.

उत्तर पश्चिम दिल्ली मॉडल टाऊनमध्ये राहणारा नीरज हा फैजलच्या घरी गेला होता व येथेच त्यांची हत्या करण्यात आली. नीरज घरी पोहोचला नसल्याने त्याच्या एका मित्राने 14 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासात नीरजच्या लोकेशनचा पत्ता लागला मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान नीरजच्या पत्नीने संशयित असलेल्या फैजलविरोधात गुन्हा दाखल केला.

नीरजच्या पत्नीने सांगितलं की, नीरजचं फैजलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. यावेळी जेव्हा पोलिसांनी फैजलची चौकशी केली तेव्हा तिने आधी या प्रकरणापासून हात वर केले मात्र नंतर तिने त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. ती म्हणाली की, ती नीरजच्या करोल बाग कार्यालयात काम करीत होती आणि तिचं नीरजसोबत गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते आणि नीरज हा तिच्यासोबत लग्न देखील करणार होता.

फैजल नीरजच्या कार्यालयात काम करीत होती. दोघांमध्ये 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. विवाहित नीरज याला फैजलशी लग्न करायचे होते. दरम्यान फैजलने कुटुंबाच्या दबावापोटी जुबैरसोबत साखरपूडा केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा फैजलने नीरजला याबाबत सांगितलं त्यावेळी नीरज याने फैजलच्या कुटुंबीयांना तिचं जुबैरशी लग्न लावण्यापासून रोखलं. घटनेच्या दिवशी 13 नोव्हेंबरच्या रात्री नीरज हे फैजलच्या आदर्श नगर येथील भाड्याच्या घरात पोहोचले. येथे नीरज आणि तीन आरोपींमध्ये मोठा वाद झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी नीरजचा त्या तीन आरोपींसोबत मोठा वाद झाला. यामध्ये जुबैरने नीरजच्या डोक्यावर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. नीरज घायाळ होताच आरोपीने यानंतर नीरजच्या पोटात तीनवेळा चाकूने भोसकलं. त्यानंतर त्याचा गळा कापला. यानंतर तिथे हजर असलेल्या इतर आरोपींनी नीरजचा मृतदेह ठिकाणी लावण्याचा प्लान तयार केला. त्यांनी नीरजच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन एका सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर ऐप बेस्ड टॅक्सी करीत सुटकेस घेऊन निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचले.

रेल्वेच्या पँट्रीमध्ये काम करणारा जुबैर गोव्याकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला आणि रस्त्यात मृतदेह फेकून दिला. उत्तर पश्चिम दिल्लीचे डीसीपी विजयंत आर्य यांनी सांगितलं की, या प्रकरणात जुबैर, फैजल आणि तिची आई शाहीन नाज (45) यांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडाचा रॉड आणि चाकूही सापडला आहे. नीरजचा मृतदेह नक्की कुठे फेकला ? यासाठी आरोपींची कसून चौकशी सुरु असल्याचे देखील पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.