नगर जिल्ह्यात एक घटना संगमनेरमध्ये समोर आलेली असून संगमनेर शहरात वाडेकर गल्ली एका पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी तीन तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गणेश मच्छिंद्र वाडेकर ( वय 52 ) आणि त्यांची पत्नी गौरी गणेश वाडेकर ( वय 48 ) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. गणेश वाडेकर यांनी नगरपालिकेतून स्वेच्छानिवृत्ती निवृत्ती घेतलेली होती तर त्यांच्या पत्नी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा श्रीराज वाडेकर याने एका खोलीत गळफास घेतला होता त्याआधी त्यांचा छोटा मुलगा श्रेयस याने देखील वाडेकर गल्लीतील घरात आत्महत्या केली होती त्यानंतर या दांपत्याने देखील आत्महत्या केल्यानंतर परिसरात शोककळा पसरलेली आहे .