छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे कोसळल्यानंतर मुख्य शिल्पकार असलेला जयदीप आपटे हा या प्रकरणात दोषी आढळून येत असून आठ दिवसांपासून तो पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या पाठीमागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सोशल मीडियात असून तो आरएसएसचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केलेली असून आपटे याच्या सोबत बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याच्यावर देखील सदोष वधाचा प्रयत्न, सरकारची फसवणूक व इतर कलमे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चेतन पाटील यांना अटक करण्यात आलेले असून आपटे अजून पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही