सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून खून, अखेर ‘ त्या ‘ आरोपीस जन्मठेप

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना 2021 मध्ये घडलेली होती. सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून मावस भावाचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी या प्रकरणात काम पाहिले. 

उपलब्ध माहितीनुसार , भागवत उर्फ मिठू भगवान बडे ( वय 28 वर्ष राहणार रामकृष्ण नगर वडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून आरोपी 28 डिसेंबर 2021 रोजी शेताला पाणी देण्यासाठी केलेला होता त्यावेळी त्याचा भाऊ असलेला भागवत गर्जे याच्यासोबत झालेल्या वादानंतर भागवत बडे याने त्याचा खून केला आणि त्यानंतर मृतदेह विहिरीत ढकलून दिला. 

ग्रामस्थांनी भागवत गर्जे यास विहिरीबाहेर काढले मात्र त्यांचा तोपर्यंत मृत्यू झालेला होता. पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते. सदर प्रकरणी भागवत बडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सरकारी वकील म्हणून अर्जुन पवार यांनी काम पाहिले आणि त्यांना मूळ फिर्यादींचे वकील एडवोकेट योगेश सूर्यवंशी , ऍडव्होकेट सचिन बडे यांनी सहकार्य केले. 


शेअर करा