अखेर जयदीप आपटे ताब्यात पण पुतळ्या पाठीमागे खरी तडजोड कुणी केलीय ? 

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे कोसळल्यानंतर मुख्य शिल्पकार असलेला जयदीप आपटे यास अखेर अटक करण्यात आली आहे . बुधवारी रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आली. तो आरएसएसचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केलेली होती. जयदीप आपटे याच्या सोबत बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याच्यावर देखील सदोष वधाचा प्रयत्न, सरकारची फसवणूक व इतर कलमे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चेतन पाटील याला अटक करण्यात आलेली असून आपटे ताब्यात आल्यानंतर छत्रपतींचा पुतळा प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन व्हावे म्हणून अक्षम्य दुर्लक्ष या कामात करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केलेला आहे. पंतप्रधान मोदी यांची सरबराई करण्यासाठी छत्रपतींच्या पुतळ्याच्या दर्जाशी तडजोड करण्यात आली आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे. जयदीप आपटे याला अटक करण्यात आलेली असली तरी मुख्य सूत्रधार मात्र अद्याप हाती आलेले नाहीत. 

छत्रपतींचा पुतळा धातूचा आहे असे सांगण्यात आलेले होते मात्र हा पुतळा अवघ्या 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने कोसळला त्यावेळी केवळ लोखंडी स्ट्रक्चर आणि वरतून धातूचे दिसावेत अशा पद्धतीने केलेले पुतळ्याचे डिझाईन असल्याचे उपलब्ध फोटो वरून दिसते आहे. केवळ घाई करून छत्रपतींच्या पुतळ्याशी केलेली तडजोड आगामी काळात महायुती सरकारला प्रचंड अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. 


शेअर करा