भाजपच्या नगरसेवकावर विनयभंग आणि पॉक्सो, नगर जिल्ह्यातील घटना 

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून अकोले येथील भाजपचा नगरसेवक हितेश रामकृष्ण कुंभार याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. अकोले पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती खाजगी शिकवणीवरून घरी जात असताना कुंभार तिच्याकडे एकटक बघून बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि तिचा पाठलाग करायचा. 30 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने तिचा हात पकडून ‘ तू मला फार आवडतेस ‘ असे म्हणत तिच्या अंगावर हात फिरवला, असे पीडित मुलीचे म्हणणे आहे.

पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,’ तेरा वर्षांची मुलगी माझ्यासमोर आली त्यावेळी ती भेदरलेल्या अवस्थेत होती. मी तिला विश्वासात घेऊन माहिती विचारली .  मुलीने माहिती दिल्यानंतर घटना सत्य असल्याची खात्री झाल्यावर नगरसेवक हितेश कुंभार याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केलेली आहे. समाजातील अशा प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे ,’ असे म्हटलेले आहे


शेअर करा