पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइकच्या वृत्तावर ‘ अखेर ‘ लष्कराने केला खुलासा : पहा काय म्हटले आहे ?

शेअर करा

गोदी मीडियाने कुठलीच शहानिशा न करता वृत्त देण्याचे प्रकार याआधी देखील घडलेले आहेत मात्र आता लोक सजग झाल्याचे लक्षात येऊ लागल्याने वारंवार तोंडावर आपटत असल्याने चक्क लष्कराच्या नावाने देखील मीडियाने अफवा पसरवायला सुरु केले आहे . अशीच एक बातमी आज व्हायरल झाली होती आणि त्यात लष्कराने चक्क पीओकेमध्ये घुसून कारवाई केली आणि दहशतवादी तळ, अतिरेकी ठार केल्याचे देखील म्हटले होते. पाकिस्तानच्या मीडियाने देखील यावर एक ओळ देखील लिहलेली नाही मात्र अखेर भारतीय लष्करानेच गोदी मीडियाचा पर्दाफाश केला असून पुन्हा एकदा गोदी मीडिया तोंडावर आपटली आहे .

भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झाला नाही असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. एवढंच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्तही खोटं असल्याचं भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी सांगितलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. या वृत्ताला काहीही अर्थ नाही हे वृत्त खोटं आहे असं परमजित सिंग यांनी म्हटलं आहे.

काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.


शेअर करा