लव्ह मॅरेजसाठी मदत केली म्हणून गाठलं अन.., नगरमधील घटना

शेअर करा

नगरमध्ये किरकोळ कारणावरून मारहाण करण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार शहरातील कल्याण रोडवर घडलेला आहे . लव्ह मॅरेजसाठी मदत केली म्हणून चार जणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गणेश संजय साठे ( वय 25 वर्ष राहणार भावना ऋषी सोसायटी कल्याण रोड ) असे फिर्यादी व्यक्ती त्यांचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्रवीण सिताराम लोखंडे , महादू सिताराम लोखंडे , हिरामण सिताराम लोखंडे आणि एक महिला या सर्वांनी भावना ऋषी सोसायटीजवळ फिर्यादी व्यक्तीला गाठले आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. तोफखाना  पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा