पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही मानसिकदृष्ट्या संपवलं , राहुल गांधी म्हणाले की..

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही मानसिकदृष्ट्या संपवलं आहे असा खडा प्रहार काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळलेला असून त्यांचे सरकार सत्तेवरून हटवण्याची वेळ आलेली आहे असे राहुल गांधी यांनी जम्मू इथे बोलताना म्हटलेले आहे. 

राहुल गांधी म्हणाले की ,’ जीएसटी आणि नोटबंदीमुळे छोट्या उद्योगांना फटका बसला. हे सरकार केवळ दोन अब्जाधीशांसाठी काम करत आहे. मोदींचे कार्पोरेट मित्र आणि अंबानी यांचे नाव घेऊ नये असे मला सांगण्यात आलेले होते म्हणून मी त्यांच्यासाठी एवन आणि एटू अशी टोपण नावे वापरत आहे. आम्ही दोघे आणि आमचे दोघे असे हे सरकार असून मोदी शहा अंबानी अडाणी हे चार जण सरकार चालवत आहेत. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की , या दोन अब्जाधीशांच्या कल्याणासाठी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले आणि राज्याचा दर्जाही काढून घेण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती देशाच्या इतर भागांपेक्षा वाईट आहे. बेरोजगारीचा दर इथे सर्वाधिक आहे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकारने काहीही केलेले नाही, असेही तिन्ही पुढे म्हटलेले आहे . 

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात  विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. 2019 ला कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक असून भाजपला जम्मू-काश्मीरचे नागरिक कितपत स्वीकारतात हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.


शेअर करा