नगर जिल्ह्यात एक खळबळजनक जनक अशी घटना समोर आलेली असून लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर पाच वर्षांपासून पोलिसाकडून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कर्जत तालुक्यातील ही घटना असून आरोपी हा सध्या जळगाव पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून काम करतो.
उपलब्ध माहितीनुसार , पाराजी कोंडीराम वाघमोडे असे आरोपीचे नाव असून त्याने कर्जत तालुक्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 2019 पासून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आणि लग्नाचा तगादा लावल्यास तो टाळाटाळ करू लागला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी सोबत इतर चार जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .