नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पतीच्या निधनानंतर नणंद आणि तिच्या पतीने कागदपत्रांचा खोटा व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी पीडित महिलेने केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रीना सारसर असे तक्रारदार महिलेचे नाव असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाच्या मागणीतून त्यांनी न्याय मागितलेला आहे. रीना यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या एकट्या असल्याचा फायदा घेत मोठी ननंद आणि तिच्या पतीने जावेच्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन पीडित महिलेची नालेगाव परिसरातील राहते घर परस्पर व्यवहार करून महिलेची फसवणूक केली , असे तक्रारदार महिलेचे नाव आहे .
राहत्या घरातून फसवणूक करून घराबाहेर काढल्यानंतर भाड्याच्या घरात राहण्याची त्यांच्यावर वेळ आलेली असून संबंधित व्यक्तींनी अनेकदा आपल्याला धमक्या देखील दिलेल्या आहेत. त्यांच्यापासून आपल्या जीविताला धोका आहे. आपल्या निवेदनाची योग्य ती दखल घ्यावी असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्यांनी एका निवेदनातून म्हटलेले आहे.