राहुरीत हॉटेलच्या नावाखाली भलताच ‘ उद्योग ‘, हॉटेल मालकासह तीन ग्राहक आणि एक तरुणी धरली : अशी झाली कारवाई ?

  • by

लॉकडाऊन खुला झाल्यापासून अवैध व्यवसाय देखील पुन्हा नव्या जोमाने सुरु झाल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. राहुरी खुर्द येथे वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या हॉटेल न्यू भरत इथे पोलिसांनी छापा टाकून एका तरुणीसह तीन ग्राहक आणि हॉटेल मालकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई श्रीरामपूर येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गुरुवारी केली आहे.

अहमदनगर शहराला जोडणाऱ्या हायवेवरील काही धाब्यांवर गेले कित्येक वर्षांपासून असे अवैध व्यवसाय सुरू आहेत मात्र जुजबी कारवाई केल्यानंतर काही दिवसात सदर व्यवसायिक पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करतात. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी खुर्द येथील नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यू भरत याठिकाणी राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबरी मार्फत मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी कारवाईसाठी सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे गुरुवारी 19 तारखेला दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी तसेच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी ताबडतोब पोलीस नाईक रंगनाथ टाके, गणेश फाटक,चालक लक्ष्मण बोडके,राजेंद्र आरोळे, सुरेश औटी,अशोक कुदळे आणि महिला पोलीस हवालदार नूतन काळभोर यांना कारवाईसाठी सज्ज केले.

सुरुवातीला डमी ग्राहक पाठवून खात्री झाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. हॉटेल चालक सय्यद फरहाद इरशाद अहमद ( वय 32 राहणार पाण्याची टाकी राहुरी ) याच्यासह वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका तरुणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत राहुरी पोलिसात रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते