सासऱ्याने तीन जणांना मदतीला बोलावत जावयाला बेदम मारहाण केली

शेअर करा

सासऱ्याने तीन जणांना मदतीला बोलावत जावयाला बेदम मारहाण केली

नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सासऱ्याने तीन जणांना मदतीला बोलावत जावयाला बेदम मारहाण केली आहे. तपोवन रोड जवळील छत्रपतीनगर इथे ही घटना घडली आहे

उपलब्ध माहितीनुसार , सुमेध विजय मेढे ( वय 40 वर्ष छत्रपती नगर तपोवन रोड सावेडी ) असे मारहाण झालेल्या जावयाचे नाव असून दोन तारखेला तोफखाना पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बापू केरू साबळे यांच्यासोबत इतर तीन महिलांनी तपोवन रोडवर फिर्यादी यांना गाठले आणि त्यानंतर बेदम मारहाण केली. सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या पत्नी सोबत बोलत होते त्यावेळी सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी यांना मारहाण केली असे फिर्यादींचे म्हणणे आहे . 


शेअर करा