पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त , निदान आगामी काळात तरी..

शेअर करा

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला अखेर भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्यात आलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगा च्या परीक्षेत मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षेला बसून फसवणूक केल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने दिव्यांग आणि ओबीसी कोट्याचा तिने प्रयत्न केल्याचे समोर आलेले आहे. पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त झाल्यानंतर आगामी काळात तरी अशा परीक्षांमधील संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. 

पूजा खेडकर हिने अटकपूर्व जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.6 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशाअंतर्गत पूजा खेडकर हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून तात्काळ मुक्त करण्यात आलेले आहे. 

31 जुलै रोजी पूजा खेडकर हिची हंगामी उमेदवारी रद्द करण्यात आलेली होती मात्र त्या विरोधात दिले उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता विकलांगतेच्या चाचणीला सामोरे जायचे देखील त्यांनी तयारी दाखवली मात्र तिच्या अटी पूर्ण झालेला केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवलेला होता


शेअर करा