ज्येष्ठ छायाचित्रकार आणि पत्रकार दत्त इंगळे यांचे दुःखद निधन

शेअर करा

नगर जिल्ह्यात सर्वांना परिचित असलेले आणि दैनिक सकाळ चे ज्येष्ठ छायाचित्रकार आणि नगर तालुका बातमीदार दत्ता गोविंद इंगळे ( वय 54 वर्षे ) यांचे शनिवारी सात तारखेला अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी , दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. 

नगर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून ते पत्रकार आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करायचे. गेल्या  पंधरा दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती त्यानंतर सुरुवातीला नगर आणि नंतर पुणे इथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र सात तारखेला त्यांची प्राणज्योत मालवली.सात तारखेला संध्याकाळी त्यांच्यावर नगर शहरातील अमरधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नगर जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात त्यांची मोठी ओळख होती. वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेले होते. त्यांच्या छायाचित्रांना अनेक पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे.


शेअर करा