नेप्ती कांदा मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

शेअर करा

नगर शहरात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून नेप्ती कांदा मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला करत पन्नास लाख रुपयांची रोकड पळवून नेण्यात आलेली आहे. सात तारखेला भर दिवसा सकाळी 11:00 च्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , समीर ट्रेडिंग कंपनीच्या दोन्ही भावांवर हा हल्ला झालेला असून दोन्ही व्यापारी सकाळी अकराच्या सुमारास नगरकडून नेप्ती कांदा मार्केटकडे जात होते त्यावेळी एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत त्यांच्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले. ते गंभीर जखमी झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्याजवळील पैशाची बॅग घेऊन आरोपींनी पोबारा केला. 

सदर घटनेची माहिती मिळताच नेप्ती मार्केटमधील व्यापाऱ्यांनी तात्काळ दोघांना खाजगी रुग्णालयात हलवले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासोबत कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा शोध सुरू आहे . 


शेअर करा