राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार सात तारखेला सकाळी राहुरीत समोर आलेला आहे. भर बाजारपेठेत मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचे वय अवघे आठ वर्षे असून ती तिसरीत शिकते.
धीरज कलुटन कुमार ( वय वीस वर्षे राहणार पटना राज्य बिहार ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि अपहरणाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .