नगर जिल्ह्यामध्ये खाजगी सावकारांचा धुमाकूळ , धामणगावच्या सावकारावर गुन्हा दाखल

शेअर करा

गर जिल्ह्यामध्ये खाजगी सावकारांचा धुमाकूळ घातलेला असून कोरोनानंतर खाजगी सावकारांच्या मनमानीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशाच एका खाजगी सावकाराच्या विरोधात जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , बाजीराव मोहन बहादुरे असे फिर्यादी शेतकरी यांचे नाव असून अशोक रामहरी सुरवसे ( राहणार धामणगाव ) असे सावकाराचे नाव आहे. फिर्यादी यांनी तीन टक्के व्याजाने शेतीच्या कामासाठी सावकाराकडून पैसे घेतलेले होते मात्र त्या मोबदल्यात दोन कोरे चेक सावकाराला देण्यात आले आणि फिर्यादी यांनी सावकाराला सर्व रक्कम परत देखील केली असे फिर्यादींचे म्हणणे आहे. 

रक्कम परत करून देखील सावकाराकडून चार टक्के व्याजाने आकारणी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी व्यवहार पूर्ण झालेला आहे असे सांगितले मात्र सावकाराचे काही समाधान होत नव्हते. त्यातून वाद झाल्यानंतर सावकाराने एक लाख 35 हजार रुपये कोऱ्या चेकवर रक्कम टाकली आणि फिर्यादी यांनी घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेले पैसे परस्पर काढून घेतले आणि अधिक पैशाची मागणी करू लागला त्यानंतर आरोपी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा