ज्याप्रमाणे मुंबईतले उद्योग त्यांनी पळवले त्याप्रमाणे लालबागचा राजा देखील.. 

शेअर करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या उद्देशाने भाजप नेत्यांचे दौरे महाराष्ट्रात सुरू झालेले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. संजय राऊत म्हणाले की ,’ ज्याप्रमाणे मुंबईतले उद्योग त्यांनी पळवले त्याप्रमाणे लालबागचा राजा देखील गुजरातला पळवतील का काय ? ‘ अशी शंका मला आहे. 

संजय राऊत म्हणाले की ,’ लालबागचा राजा प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक इथे येतात त्यामुळे आता लालबागचा राजा देखील गुजरातला पळवून नेला जाईल की काय अशी शक्यता आहे. अमित शहा यांच्याबद्दल महाराष्ट्रात नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. ते देशाचे गृहमंत्री असले तरी कमजोर गृहमंत्री आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे तर जम्मू काश्मीर मणिपूर आणि देशातील इतर भागांकडे त्यांचे लक्ष राहिलेले नाही ,’ असे देखील ते पुढे म्हणाले. 


शेअर करा