मराठा आणि शेतकऱ्यांचा त्रास तुम्हाला दिसत नाही का ? , मनोज जरांगे म्हणाले की..

शेअर करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड इथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ,’ तुमच्या राजकारणासाठी मराठ्यांना त्रास देऊ नका. मराठा आमदारांना माझ्या अंगावर घालत आहात. मराठा आणि शेतकऱ्यांचा त्रास तुम्हाला दिसत नाही का ? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारलेला आहे. 

मनोज जरांगे म्हणाले की ,’ मराठ्यांच्या विरोधात बोलणारे जन्माला येत आहेत या सगळ्यांचा हिशोब करणार आहे. अशा लोकांनी मराठ्यांच्या पोरांचा घात केलेला आहे. मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर सरकार पाडणारच. आम्ही कष्ट करून मुलांना शिकवतो. कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. आमची चूक काय आहे ? 

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की ,’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. समाजाची मुले अधिकारी व्हावीत म्हणून रात्रंदिवस मेहनत करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये देत आहात मग भाच्यांचे काय ? भाच्यांना आरक्षण द्या ,’ असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा