पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पतीचे विवाहबाह्य संबंध आटोक्यात येत नसल्याने हतबल झालेल्या विवाहितेने अखेर टोकाचे पाऊल उचलेले आहे. हडपसर भागातील भेकराईनगर इथे ही घटना घडली आहे .
उपलब्ध माहितीनुसार , तेजश्री आकाश उदमले ( वय 22 वर्ष राहणार शिक्षक कॉलनी भेकराईनगर ) असे मयत महिला यांचे नाव असून आरोपी तसेच महिलेचा पती आकाश अशोक उदमले ( वय पंचवीस वर्षे ) याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
आकाश आणि तेजश्री यांचा मार्च 2019 मध्ये विवाह झालेला होता मात्र आरोपी आकाशचे इतर एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची पत्नीला माहिती मिळाली आणि त्यातून कुटुंबात वाद सुरू झाले. अनेकदा सांगून देखील पतीच्या वर्तनात बदल झाला नाही आणि आरोपीने त्यानंतर पत्नीचा छळ सुरू केला. अखेर सात तारखेला विवाहित महिलेने गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे.