सातत्याच्या छेडछाडीला ती वैतागली होती अखेर तिने ‘ केले असे ‘ की शहर हादरले..

  • by

सततच्या छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना परळी शहरातील सावतामाळी नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली केशव नागरगोजे असं मृत अल्पवयीन मुलीचं नाव असून सततच्या छेडछाडीला वैतागून तिने हा निर्णय घेतल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार, अंजलीच्या घराजवळ राहणारा मंगेश भास्करराव कोपनबैने (वय-29) हा तरुण तिची मागील वर्षभरापासून छेड काढत होता. मंगेश नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी आग्रह धरत होता. मोबाईल नंबर मागून तिची छेड काढत होता. हा सततच्या त्रास असह्य झाल्याने अंजलीने अखेर बुधवारी (19 नोव्हेंबर) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती अंजलीचे वडील केशव रंगनाथ नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीत दिली आहे.

या फिर्यादीवरून आरोपी मंगेश भास्करराव कोपनबैने याच्यावर संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 306, 354 (ड) यासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे.