चालत्या गाडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण समोर

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून चालत्या गाडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे . 

नराधमांनी पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर ही गाडी एका विजेच्या खांबाला धडकली त्यावेळी दोन्ही आरोपींनी तेथून पलायन केले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे

उपलब्ध माहितीनुसार , मोहम्मद अरिफ आणि मोहम्मद रिजवान अशी दोन्ही आरोपींची नावे असून त्यांनी गोंडा इथे एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण केलेले होते. मोटारीत आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी विजेच्या खांबाला धडकली. 

अपघात झाल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले आणि अल्पवयीन मुलगी देखील त्यानंतर घरी आली त्यावेळी तिने दोन्ही आरोपींची नावे पोलीस आईला सांगितली आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींनी नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी म्हणून ही चारचाकी गाडी नेल्याचे चार चाकी गाडीच्या मालकाने सांगितलेले आहे. 


शेअर करा