नागरिकांकडून देखील आता महापालिका प्रशासनाला सहकार्य होत नसल्याचे समोर

शेअर करा

नगर शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांविषयी महापालिका प्रशासनाची संपलेली संवेदनशीलता यामुळे नागरिकांकडून देखील आता महापालिका प्रशासनाला सहकार्य होत नसल्याचे समोर येत आहे. मनपाच्या मनपा कर शास्तीत तब्बल 100% सूट देऊन देखील थकबाकी वसुली होत नसल्याचे समोर येत आहे . 

महापालिका आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी मालमत्तेच्या करात शंभर टक्के शास्ती माफ केली मात्र तरी देखील थकबाकीदार थकबाकी भरण्यास तयार नाहीत त्यानंतर प्रशासनाने आता थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केलेली आहे.  कोरोना संकटानंतर अनेक जण अद्यापही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत अशातच महापालिकेचा करदेखील काही प्रमाणात वाढलेला आहे आणि मूलभूत सुविधांचा तर नगरमध्ये बोजवारा उडालेला आहे. राजकीय नेत्यांचे फ्लेक्स आणि रस्त्यामय खड्डे तसेच रात्रीच्या वेळी असलेला अंधार , वेळी अवेळी सुटणारे पाणी यामुळे नगरकरांना ग्रामपंचायतीत बऱ्या सेवा असतात महापालिकेत नाही असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. 

विशेष बाब म्हणजे थकबाकी न भरणाऱ्यांमध्ये धनदांगड्या व्यक्तींचा जास्त समावेश असून महापालिका प्रशासनाने अशा व्यक्तींवर कारवाई करण्यास प्राथमिकता दर्शवण्याची गरज आहे . आधीच पिचलेल्या गोरगरीब नगरकरांना नोटिसा पाठवून महापालिका अधिकारी स्वतःची पाठ थोपटून घेतात मात्र त्यातून मनपाला अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. धनदांगड्या व्यक्तींकडून कुठल्याही राजकीय दबावाला भीक न घालता पालिका अधिकाऱ्यांनी प्रथम त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी नगरकरांकडून केली जात आहे . 


शेअर करा