नगरमध्ये किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून आमची बदनामी का करता असे म्हणत दोन महिलांनी एका महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी करत जखमी केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , केडगावमधील ही घटना असून दीक्षा निलेश मिसाळ ( वय 26 वर्ष राहणार देवीच्या मंदिराजवळ केडगाव ) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमल सतीश मिसाळ , प्रियंका गणेश मिसाळ ( दोघीही राहणार कल्याण रोड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
फिर्यादी पाचच्या सुमारास घरी असताना दोन्ही आरोपी फिर्यादी यांच्या घरी आल्या आणि त्यांनी फोनवर माझी तुम्ही बायकांमध्ये बदनामी का करता ? असे म्हणत फिर्यादी यांस शिवीगाळ आणि दमदाटी केली. फिर्यादी यांच्या तोंडावर स्टीलचा ग्लास मारून त्यांना जखमी केले असे देखील फिर्यादींचे म्हणणे आहे.