नगर तालुक्यातील प्रख्यात अशा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या शाखेत तब्बल 94 लाख 14 हजार रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असून भाग्यलक्ष्मीचे संचालक यांच्यासोबत तब्बल 18 जणांवर एमआयडीसी पोलिसात एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत बबन पुंड ,उपाध्यक्ष अश्विनी भारत पुंड ,बबन सहादू पुंड ,वैभव बाळासाहेब विधाते ,शोभाबाई गोरक्षनाथ विधाटे ,जालिंदर देवराम विधाटे ,सचिन दत्तात्रय विधाटे ,अक्षय पांडुरंग शेलार ,रावसाहेब नथू कळमकर ,भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड ,प्रवीण दत्तात्रय राऊत ,शुभम संजय धनवडे,अनिकेत प्रवीण भालवणकर,गायत्री राजेंद्र बनकर ,पुनम अरविंद मगर ,ऐश्वर्या बाळासाहेब गायकवाड ,नितीन घुमरे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट आर्थिक संकटात सापडल्यानंतर ठेवीदारांचे प्रचंड हाल होत असून यापूर्वी देखील ठेवीदारांनी पोलिसात संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून गर्दी केलेली होती . ठेविदारांचे पैसे अडकल्यानंतर अनेक जणांच्या आर्थिक अडचणी झालेल्या असून वैद्यकीय उपचार तसेच लग्न देखील रखडलेली आहेत.