समाजाला आरक्षण दिलेले नाही तसेच आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेतलेले नाही उलट माझ्यावर मराठा आमदार सातत्याने टीका करत आहेत हे सहन होत नाही त्यामुळे 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटी इथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ याआधी सापडलेल्या कुणबी नोंदी कुठे आहेत आणि त्या कशा जळाल्या ? . त्याचे पंचनामे कुठे आहेत . हैदराबादी इथे सापडलेले पुरावे कुठे आहेत ?. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन देखील समिती काम करताना दिसत नाहीत. कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारने बंद का केलेले आहे ? ‘
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की ,’ मराठा धनगर आरक्षणासोबत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर देखील मी बोलत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ते सहन होत नाही. माझे आंदोलन रोहित पवार चालवतात असा आरोप राजेंद्र राऊत हे करतात तर मग सत्ता तुमची आहे चौकशी करा. माहिती घ्या उगाच काही बोलू नये अन्यथा मराठा समाज त्यांना निवडणुकीत जागा दाखवेल ,’ असेही ते पुढे म्हणाले .