दिल्ली एवढा भूभाग सध्या चीनच्या ताब्यात आहे मात्र भारतातील माध्यमे , काय म्हणाले राहुल गांधी ?

शेअर करा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात पुन्हा एकदा चीन सोबतच्या संघर्षावरून केंद्र सरकारला धारेवर धरलेले असून या सरकारला चीन प्रश्न नीट हाताळता आलेला नाही. देशाची 4000 चौरस किलोमीटर भूमी चीन सैन्याच्या ताब्यात आहे ही शोकांकिता आहे असे म्हटलेले आहे. 

वॉशिंग्टन इथे पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला असून पंतप्रधान मोदींना ज्या पद्धतीने अमेरिका दौऱ्यात प्रतिसाद मिळाला त्यापेक्षा देखील अधिक मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना सध्या अमेरिकन तसेच अनिवासी भारतीयांचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. 

राहुल गांधी म्हणाले की ,’ अमेरिकेसोबतचे संबंध , दहशतवाद संपेपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही, बांगलादेशमधील कट्टर वाद्यांच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता अशा मुद्द्यांवर भाजपने घेतलेल्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा आहे. अमेरिकेबरोबर आमच्या सरकारची जी भूमिका होती तीच मोदींनी कायम ठेवलेली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन मिळत असल्याकारणानेच संबंध बिघडलेले आहेत असे सांगत दिल्ली एवढा भूभाग सध्या चीनच्या ताब्यात आहे मात्र भारतातील माध्यमे याविषयी काही बोलत नाहीत ,’ असे म्हटलेले आहे .


शेअर करा