आता संकेतला पण निबंध लिहायला लावून सोडून देणार का ?

शेअर करा

नागपूर येथील ऑडी मोटार अपघात प्रमाणात प्रकरणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी खोचक टीका करत आरोपी संकेत बावनकुळे याला देखील ‘ आता संकेतला पण निबंध लिहायला लावून सोडून देणार का ? ‘ असा प्रश्न सरकारला विचारला आहे. 

नागपूर शहरात आठ तारखेला रात्री भरधाव ऑडी मोटारीने दोन मोटारी आणि एका दुचाकीला धडक दिली होती. ही ऑडी मोटार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाची असल्याची माहिती समोर आलेली आहे. तक्रारदार व्यक्ती यांच्यावर प्रचंड दबाव आहे . 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की ,’ फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित वर्गातील आहेत.  त्यांना पोलीस संरक्षण दिले गेले पाहिजे. माध्यमांसमोर ते आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या जीविताची मला काळजी आहे ,’ असे देखील त्या म्हणाल्या


शेअर करा