खासदार निलेश लंके यांची पारनेर तालुक्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ खास ‘ मागणी

शेअर करा

खासदार निलेश लंके यांनी ‘ तालुक्याचे ठिकाण असलेल्या पारनेर शहरात कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र सुरू करावे आणि अठरा वर्षांवरील नागरिकांचे आधार कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करावे ‘, अशी मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केलेली आहे. 

निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की ,’ पारनेर तालुक्यात आधार कार्ड केंद्र नसल्याकारणाने अनेक नागरिकांचे हाल होत आहेत . 18 वर्षांवरील वयाच्या नागरिकांचे आधार कार्ड काढण्यासाठी पारनेर तालुक्यात एकही आधार केंद्र नाही त्यामुळे सर्व नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी नगरला यावे लागते त्यामुळे विनाकारण आर्थिक भुर्दंड बसतो तसेच वेळ आणि पैसाही वाया जातो त्यामुळे पारनेर इथे विशेष कॅम्पचे आयोजन करून अठरा वर्षांवरील नागरिकांना कार्ड काढण्याची सुविधा देण्यात यावी ,’ असे देखील लंके यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा