नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे कुटुंबीय मुख्य आरोपी असताना आणि पोलिसांना ते सापडत नसताना दुसरीकडे नगर शहरात दिलीप गांधी यांचे पुत्र सुर्वेन्द्र गांधी यांचा ‘ क्षमायाचना ‘ फ्लेक्स शहरात लावण्यात आलेला आहे. एकीकडे ठेवीदार ठेवींची रक्कम मिळत नाही म्हणून कोर्टाचे हेलपाटे मारत असताना दुसरीकडे आरोपी कुटुंबीय पोलिसांना सापडत नसल्याने शहरात उलटसुलट चर्चेला सुरुवात झालेली आहे. ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा ‘ क्षमायाचना ‘ फ्लेक्स नगर शहरात चर्चेचा विषय ठरतो आहे.
नगर अर्बन बँक कर्ज व्यवहार प्रकरणात अनेक आरोपी गजाआड झालेले असले तरी ठेवीदारांना मात्र अद्यापपर्यंत ठेवीची संपूर्ण रक्कम परत मिळालेली नाही. कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखा आक्रमक झालेली असून तब्बल 44 कोटी रुपयांचे कर्ज थकवणाऱ्याला केशव काळे नामक कर्जदाराला प्रोफेसर कॉलनी चौकातून दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेले आहे.आर्थिक गुन्हे शाखेकडून आत्तापर्यंत केवळ मोहरेच आक्रमकता दाखवण्यात आलेली आहे मात्र मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत .
नगर अर्बन बँक ही काही वर्षांसाठी तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली होती. गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेले संचालक मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू केली आणि नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप सुरू केले. अर्थातच या कर्ज वाटपाचा काही हप्ता वरिष्ठ यांच्यापर्यंत देखील पोहोचत असल्याने त्यामुळे बराच काळ या प्रकरणाची कुठे वाच्यता होत नव्हती. ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत करण्यास अडचण येत असल्याने प्रकरण बाहेर आले आणि त्यानंतर हा घोटाळा तब्बल 291 कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले.
अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा सध्या मिळत नसल्याकारणाने अनेक ठेवीदारांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक जणांच्या कुटुंबातील लग्न रखडली आहेत तर काहीजणांना वैद्यकीय उपचारासाठी देखील पैसे राहिलेले नाहीत. ठेविदारांची ठेवीची रक्कम परत करण्यापेक्षा क्षमायाचना फ्लेक्स लावणे सोपे असल्या कारणाने असे फ्लेक्स लावून ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलेले आहे तर दुसरीकडे पोलिसांची देखील भूमिका शहरात चर्चिली जात आहे.