अल्पवयीन मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून. , नगर जिल्ह्यातील घटना 

शेअर करा

अल्पवयीन मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून

अल्पवयीन मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथे चार परप्रांतीयांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. कुकर आणि भांडी विक्रेते विक्री करण्यासाठी हे परप्रांतीय परिसरात फिरत होते त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संभाषण केले आणि त्याचा स्थानिकांना संशय आला आणि त्यानंतर या परप्रांतीयांना बेदम मारहाण करण्यात आली. 

धक्कादायक बाब म्हणजे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांना चोप देऊन शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले आणि त्यानंतर पाथर्डी पोलिसांना माहिती दिली. मिरी पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल पोपट आव्हाड यांनी गीतेवाडीत दाखल झाल्यानंतर तरुणांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाथर्डी पोलीस ठाण्यात नेले मात्र हे सर्व तरुण केवळ भांडी विक्रीसाठी आलेले होते आणि संशयातून हा प्रकार घडला असे स्पष्ट झालेले आहे.


शेअर करा