अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रधान जिल्हाध्यक्षपदी अंजू एस शेंडे यांची नियुक्ती झालेली आहे. विद्यमान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा यांची अमरावती इथे बदली झालेली असून शेंडे धाराशिव जिल्ह्यातून बदली होऊन नगर इथे आलेल्या आहेत.
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या 200 वर्षांच्या इतिहासात प्रथमच प्रधान न्यायाधीशपदी एका महिला न्यायाधीशाची नियुक्ती झालेली आहे. 18 सप्टेंबर पासून त्या आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत