गणपती विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात जातीय तणाव , दंगलीत सहभाग प्रकरणी अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे नगर शहर आणि परिसरातील 475 आरोपींवर गणेश विसर्जन आणि मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपारची कारवाई केली जाणार आहे.
शहरात जातीय तणाव आणि धार्मिक तणाव वाढू नये या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येणार असून दंगली , मारामारी खुनी हल्ले करणाऱ्या आरोपींचा यात समावेश आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दोन दिवस त्यांना शहर आणि परिसरातील पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
भारतीय न्यायसंहिता कलम 163 दोन नुसार सामाजिक सुरक्षेला बाधा करणाऱ्या गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रांत अधिकारी यांना अधिकार आहे. कोतवाली , तोफखाना , भिंगार कॅम्प , नगर तालुका आणि एमआयडीसी पोलिसांनी अशा आरोपींची यादी प्रांत अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे पाठवलेली होती त्यामध्ये तब्बल 475 आरोपींचा समावेश आहे .