कडा येथील श्रीमती शांताबाई कांतीलाल गांधी महाविद्यालय कडा आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज.मो. भंडारी हे होते. केंद्रसंयोजक प्रा. डॉ. अशोक कोरडे यांनी प्रास्ताविक केले व कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यामध्ये त्यांनी मुक्त विद्यापीठ व मुक्त शिक्षण प्रणालीबाबत माहिती दिली, तसेच विद्यापीठाच्या त्रिस्तरीय कार्यप्रणाली बद्दल माहिती देऊन त्यामध्ये कार्यपद्धती, उपलब्ध शिक्षणक्रम, आराखडा, संमंत्रकांची ओळख, वेळापत्रक, पुस्तके, पीडीएफ तसेच अंतर्गत मूल्यमापन जसे की स्वाध्याय, प्रकल्प अहवाल, प्रकल्प आराखडा, क्षेत्रीय प्रकल्प अहवाल, शिक्षण निहाय परीक्षेचे स्वरूप विविध कल्याणकारी योजना, क्रीडा महोत्सव, आविष्कार, युवक महोत्सव, अँटी रॅगिंग, स्वयंअध्ययन, स्पर्धा परीक्षा, यशस्वी विद्यार्थी यांची यशोगाथा अशा विविध विषयासंदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज.मो.भंडारी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ओळख आणि आपल्या महाविद्यालयामध्ये असणारे विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली, मुक्त विद्यापीठामुळे वंचित विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.महाविद्यालयातील सेवा सुविधांचा जास्तीत जास्त वापर तुम्ही करावा असे आव्हान त्यांनी आपल्या भाषणात केले. महाराष्ट्रातील इतर राज्यातूनही आपल्या महाविद्यालयात प्रवेश होत आहेत. त्यांनी अभ्यासकेंद्रातील केंद्रसंयोजक प्रा.डॉ.अशोक कोरडे आणि तंत्रसहायक श्री.ज्ञानेश्वर खंदारे यांचे कौतुक केले, आलेल्या विद्यार्थ्यांचा परिचय आणि त्यांचे गुलाब देऊन प्राचार्यांनी स्वागत केले, आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ.पांडुरंग अनारसे यांनी केले तर आभार डॉ.योगेश रसाळ यांनी मानले.
अभ्यासकेंद्रातील विविध विषयाचे समंत्रक डॉ.शिवराज पाताळे (वनस्पतीशास्त्र), डॉ.राजकुमार थोरवे (ग्रंथालय व माहितीशास्र), डॉ.उद्धव चव्हाण, डॉ.शिवाजी जगदाळे(रसायनशास्र), डॉ.आशिषकुमार कटारिया (रसायनशास्र), प्रा.सोमनाथ हासे (बी.सी.ए.), डॉ.अमोल कल्याणकर (इंग्रजी), डॉ.प्रकाश जाधवर (वनस्पतीशास्त्र), डॉ.नवनाथ कराळे (इंग्रजी), डॉ.किशोर चौधरी (बी.ए.), डॉ.गोरक्षनाथ शिंदे (वाणिज्य), डॉ.संजय शिंदे (बी.ए.), डॉ.श्रीकांत मगर (लोकप्रशासन), प्रा.सचिन ढगे (रसायनशास्र), डॉ.नवनाथ विधाते (इतिहास), प्रा.दत्तात्रय हारकर (मराठी), डॉ.विशाल वैद्य, डॉ.इन्नुस सय्यद (वनस्पतीशास्त्र), डॉ.तुकाराम गोंदकर, डॉ.मीरा नाथ (वाणिज्य), डॉ.अरुणा कुलकर्णी, डॉ.धनश्री मुनोत (गणित), श्री.सुनिल लोमटे, श्री.बापूराव गोंदकर, श्री.ज्ञानेश्वर भोसले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सर्व विषयांचे प्रवेशित विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.