अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा संभाव्य हल्ल्यातून बचावलेले आहेत. त्यांच्यावर रायफल रोखून उभ्या असलेल्या एका व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी पकडलेले असून आरोपीचे नाव रायन राऊथ असे आहे
आरोपी हा एका छोट्या बांधकाम कंपनीचा मालक असून सोशल मीडियावर सातत्याने डेमोक्रॅटिक पक्षाची बाजू मांडत असायचा. ट्रम्प यांच्यावर अनेकदा त्याने टीका केलेली असून त्याने तालिबानपासून पळून गेलेल्या अफगाण सैनिकांना युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी भरती करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. पाकिस्तानमधून बनावट कागदपत्राच्या सहाय्याने हे काम करणार होतो असेही त्याने म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरील संभाव्य हल्ल्याचे षडयंत्र उधळून लावल्यानंतर,’ माझ्या मालमत्तेच्या आवारात गोळीबार झाला मी पूर्णपणे सुरक्षित आहे. मला कोणीही खाली खेचू शकत नाही. मी कधीही शरण येणार नाही ‘, असे म्हटलेले आहे. ट्रम्प यांना या घटनेत सुदैवाने कुठलीही इजा झालेली नाही.