अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केलेली असून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर सुजय विखे यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली असून सुजय विखे यांच्या पराभवामागे सुजय विखे यांचा जनसंपर्क हेच मुख्य कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
सुजय विखे म्हणाले की , ‘ मला आता वेळ आहे शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या मतदारसंघात माझ्या नावावर एक मत होईल त्या मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार. श्रीरामपूर राखीव मतदारसंघ असल्याकारणाने माझ्यासमोर सध्या संगमनेर आणि राहुरी हे दोनच पर्याय आहेत ‘ असेही त्यांनी म्हटलेले आहे .