ध्वनी प्रदूषणाचा त्रास असह्य , वाद झाल्यावर टोकाचं पाऊल

शेअर करा

गणेशोत्सवात कार्यकर्त्यांचा उत्साह जरी वाढलेला असला तरी त्यामुळे परिसरातील नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो याकडे कार्यकर्ते सतत दुर्लक्ष करतात. कुणी सांगितले तर त्याच्यासोबत वाद घालतात मात्र याच वादानंतर एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याची घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडलेली आहे. ज्याला त्रास होतो त्याला पाकिस्तानात जा असे म्हणण्यापर्यंत अनेक कार्यकर्त्यांची मजल जाते मात्र ध्वनी प्रदूषणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , धनुलाल साहू ( वय 55 वर्ष ) असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्यांना हृदयविकाराचा आजार होता. परिसरात एका ठिकाणी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा मोठ्या आवाजावरून वाद झालेला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विनंती धुडकवून लावली त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही बोलवले मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत देखील उद्दाम वर्तन केले. आपल्याला त्रास होत असताना कुणीच ऐकून घेत नाही यामुळे हतबल झालेले धनुलाल यांनी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे.


शेअर करा