नगर शहरात एक दुर्दैवी अशी घटना एमआयडीसी परिसरात समोर आलेली असून वडगाव गुप्ता परिसरातील दुध डेअरी चौकात एका भाडोत्री रूमवर राहत असलेल्या तरुणाने रूममध्येच गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे . 14 तारखेला ही घटना संध्याकाळी उघडकीला आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गुरुनाथ विष्णुदास चढवाल ( वय 21 वर्ष मूळ राहणार धरणी जिल्हा लातूर सध्या राहणार दूध डेअरी चौक वडगाव गुप्ता ) असे मयत तरुणाचे नाव असून शनिवारी त्याने त्याच्या राहत्या रूमवर गळफास घेतला. घरमालक विकास चव्हाण यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे .